चंद्रपूर:- जिल्हा प्रशासन आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत, चंद्रपूर तर्फे सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी/पदयात्रेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रा. डॉ. गुरुदास बाल्की, एन.एस.एस. जिल्हा समन्वयक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.
कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. माध्यमशेट्टीवार, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत सुशिल भड, कॅप्टन डॉ. सतिश कन्नाके, प्रा. डॉ. कुलदीप गोंड, एन.एस.एस. समन्वयक, मोरेश्वर गायकवाड, क्रीडा अधिकारी, समन्वयक मंगेश डुबे उपस्थित होते.
उद्घाटन प्रा. डॉ. बाल्की यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारत एकीकरणातील कार्य स्मरण करून युवकांना राष्ट्रीय एकता, विकास आणि सेवा यांचा संदेश दिला. पदयात्रेच्या प्रारंभी प्राचार्य प्रा. डॉ. काटकर यांच्या हस्ते राष्ट्रीय एकता दिवस शपथ, आत्मनिर्भर भारत संकल्प आणि नशामुक्ती प्रतिज्ञा उपस्थित युवक-युवतींना देण्यात आली. कार्यक्रमात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य यांचेही आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या 500 युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशिल भड यांनी केले. संचालन डॉ. पुरुषोत्तम माहुरे यांनी तर आभार प्रा. डॉ. कुलदीप गोंड यांनी मानले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सोहेल, यश आसुटकर, मारोती बोबाटे, खोमेश भड व मंगेश भट यांनी मेहनत घेतली.


