
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांपासून मानव-वन्यजीव संघर्षामुळे दहशतीखाली आहे . ब्रम्हपुरी तालुक्यात काल दि. ९ नोव्हेंबर २०२५ पुन्हा एकदा वाघाने एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. Chandrapur News
मेंडकी (ता. ब्रम्हपुरी) येथील रहिवासी असलेले, अंदाजे ६४ वर्षीय भास्कर गोविंदा गजभिये यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भास्कर गजभिये हे काल, रविवारी दि. ९ नोव्हेंबर २०२५ जवराबोडी रोडवरील वन विभागाचे कपांरमेंट ९५० या जंगलाच्या परिसरात धानाच्या भारांसाठी सिंदी आणण्यासाठी गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. Brahma Taluka
त्यामुळे, कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. आज, सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी शोध सुरू असताना, जवराबोडी जंगल परिसरात त्यांचे अस्ताव्यस्त झालेले शव आढळून आले. भास्कर गजभिये यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची ही क्रूर घटना पाहून गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. Tiger Attack
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील कार्यवाही सुरू केली आहे. Forest department
या घटनेमुळे मेंडकी आणि जवळील परिसरात प्रचंड दहशत आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. शेतीत काम करण्यासाठी किंवा जंगलात आवश्यक वस्तूंसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. Bramhpuri
Tiger Attack: सिंदी आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने केले ठार!
सोमवार, नोव्हेंबर १०, २०२५

