काम आमदार देवराव भोंगळेंचं, ढोल काँग्रेसचा श्रेय घेण्यासाठी काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न
नांदा - पिंपळगाव - गडचांदूर व भुरकुंडा या महत्त्वाच्या मार्गासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर होताच तालुक्यात राजकीय श्रेयवादाची ठिणगी पेटली आहे. गेल्या पाच–सहा वर्षांपासून खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र या रस्त्याच्या निधीसाठी जो प्रत्यक्ष पाठपुरावा झाला, ती संपूर्ण जबाबदारी आमदार देवराव भोंगळे यांनी पार पाडली. आणि आता रस्ता सुस्थितीसाठी पैसा मंजूर झाल्यावर, काँग्रेसकडून हा निधी “आम्हीच आणला” असा केविलवाणा गाजावाजा सुरू झाला आहे.
मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ये जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत होते. किरकोळ अपघात ही रोजचीच बाब झाली होती. संतप्त नागरिकांनी अनेकदा आमदार देवराव भोंगळे यांची भेट घेऊन रस्त्याची विक्राळ अवस्था दाखवली. लोकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी तातडीने पुढाकार घेत ०५ जुलै २०२५ रोजी जिल्हा वार्षिक योजना ५०५४ अंतर्गत १५०
लक्ष रुपयाचा निधीकरिता पत्र दिले.
आमदार देवराव भोंगळेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर १० ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत ३०५४–३५२२ लेखाशिर्षात रस्त्यासाठी ७० लाखांची मंजुरी मिळाली. म्हणजे प्रस्तावपासून मंजुरीपर्यंत सगळी कागदपत्रे आणि धावपळ ही आमदार भोंगळे यांनीच केली, हे निर्विवाद सत्य आहे.
निधी जाहीर होताच काँग्रेसच्या काही जणांनी “हा निधी आमच्याच माजी आमदार सुभाष धोटे याचा प्रयत्नाने आला” अशी घोषणाबाजी सुरू केली. मजेशीर म्हणजे विधानसभा निवडणुकीचा तोंडावर म्हणजेच वर्षभरा आधी काँग्रेसच्या हौशी कार्यकर्त्यांनी ५० लक्ष निधी मजूर झाला म्हणून पिंपळगाव येथे रस्त्याचे भूमिपूजन करून नागरिकांना लॉलीपॉप दिला होता!ना निधी, ना आदेश पण भूमिपूजन मात्र धडाक्यात!
आता प्रत्यक्ष निधी मिळताच तेच कार्यकर्ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर श्रेयाचा डंका वाजवत आहेत. हे पाहून पिंपळगाव येथील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
रस्त्यासाठी निधी मिळाल्याने पिंपळगाव येथील नागरिकांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले असून काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
(रस्त्याचा दुरावस्थेबद्दल आम्ही आमदार देवराव भोंगळे यांना अवगत करून दिले रस्त्याचा बांधकामा करिता निधी मंजूर करून द्यावा अशी विनंती केली अखेर त्यांचा प्रयत्नाने निधी मंजूर झाला :- दिपक मडावी सरपंच पिंपळगाव)
(आमदार देवराव भोंगळे यांचा प्रयत्नाने पिंपळगाव रस्ताकरिता निधी मंजूर झाला ही वास्तविकता आहे. मात्र श्रेय घेण्यासाठी काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न सुर असून या अगोदर ही रस्त्याचे भूमिपूजन करून नागरिकांची दिशाभूल केली होती:- मारोती नागापूरे पिंपळगाव)



