समस्त बेरोजगारांना घेऊन सुरज ठाकरे यांनी घेतली बल्लारपूर वेकोली व्यवस्थापकाची भेट.

Bhairav Diwase


राजुरा:- सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासह विशेष राजुरा विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील खासदार बदलले आमदार बदलले तरी देखील मागणी अजूनही अपूर्ण..


सदस्थितीमध्ये सुरू असलेल्या कंपन्या तथा भविष्यात येणाऱ्या कंपन्यामध्ये सर्वप्रथम रोजगार मिळावा याकरिता आज दिनांक- 08 डिसेंबर 2025 ला श्री. सुरज ठाकरे यांनी समस्त बेरोजगार कामगारांसह बल्लारपूर वेकोली येथील व्यवस्थापकाची आणि कंपनीच्या व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेऊन बेरोजगारांना कामावर घेण्याकरिता निवेदन दिले.


  विशेष म्हणजेच आजी माजी नेत्यांना निवडणुकीच्या काळातच बेरोजगार तरुणांची आठवण येते आणि त्यांचा मतदाना करिता वापर केल्यानंतर त्यांचा विसर पडतो..! प्रत्येक पक्ष फक्त तरुणांचा वापर करतो, परंतु त्यांच्या भविष्यासाठी ठोस पावले उचलत नाहीत..! असे या वेळेस श्री. सुरज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

      जय भवानी कामगार संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे स्वतःच्या ओळखी आणि विश्वासावर आधारित पाठपुरावा करून अनेक ठिकाणी तरुणांना आतापर्यंत त्यांना शक्य तितका रोजगार तरुणांना उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या तात्पुरत्या प्रयत्नांना मर्यादा असल्याने या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे व बेरोजगार तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, जेणेकरून सतत शिफारशी आणि बेरोजगार तरुणांची पैशांच्या आमिषाने फसवणूक टाळता येईल असे मत याप्रसंगी श्री. सुरज ठाकरे यांनी वेक्त केले.


    या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्रातील सध्याच्या आणि भविष्यात येणाऱ्या सर्व कंपन्या व प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार देणे अनिवार्य करावे, व विशेषतः, कंत्राटदारांना कंत्राट देताना त्यांना स्थानिक भर्ती बंधनकारक करावे. 
कारण:-

१) - ही जमीन स्थानिकांची आहे, प्रदूषण आणि पर्यावरणीय नुकसान स्थानिकांना सहन करावे लागते.
२) - तरीही रोजगाराच्या संधी परप्रांतीयांना दिल्या जातात, ज्यामुळे स्थानिक तरुण उपेक्षित राहतात.
३) - हे अन्यायकारक असून, स्थानिक विकासासाठी स्थानिकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
अशी मागणी श्री. सुरज ठाकरे यांनी केली आहे. 

या मागण्या पूर्ण न झाल्यास बल्लारपूर वेकोली कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या वेळेस दिला. यावेळेस उपस्थित पदाधिकारी सहकारी तथा बेरोजगार निखिल बाजाईत, राहुल चव्हाण, रोहित भत्ताशंकर युवा शहराध्यक्ष राजुरा, आशिष कुचनकर, शंकर वाढई, सुनील काळे, अयान शेख, आदित्य ढोले, विठ्ठल मोहितकर, आकाश मोहुर्ले, मारुती वाढई, आशिष बावणे, आशिष जाधव, साहिल सय्यद, हर्षल पांडव, बंडू शेलूरकर, स्वप्निल बोबडे, सुरेश वाढइ, रोहित मारशेट्टीवार, शैलेश फुलझले, उमेश भोंगळे, कृष्णा राऊत, गणेश डेंगळे, रितेश येलमुले, श्रीकांत राऊत, कपिल उराडे, रुपेश चिलमे, राजकुमार चौधरी, निखिल येलेलवार, संकेत तिखट, गणेश लांडे, समीर शेख आदी उपस्थित होते.