चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले, तर मुलांच्या संघ उपविजेता ठरला आहे.
गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा पी.जी.टी.डी. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.
या बुद्धिबळ स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. विजेतेपद खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात प्रीती यादव, अपर्णा यादव, रुचिता केशकर, प्रीनसेस दासरी, तेजस्वनी गोडसेलवार यांनी आपल्या सुरेख खेळ, चाल, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले. मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. उपविजेते ठरलेल्या मुलांच्या संघात रोशन चौधरी, गौरव गटलेवार, कुणाल निंबाळकर, यशस्विन गेडाम, समीर शेरकी, मोहित मंडाळे यांनी देखील आपल्या सुरेख खेळ, चाल, रणनीतीचे प्रदर्शन केले.
दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्यासह उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावर, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बन्सोड, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय वाढई, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राहुल सावलीकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंत डभारे, आदित्य मंगरूळकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

