Husband and wife drown in farm pond along with son: चिमुकला खेळतांना शेततळ्यात पडला, बचावासाठी वडीलांसह आईचे शर्तीचे प्रयत्न अपयशी

Bhairav Diwase
पंढरपूर:- पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कोर्टी येथील एका शेतात लोंढे कुटुंबीय कामाला होत. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा खेळत खेळत शेतकऱ्याकडे गेला आणि पाण्यात पडला. त्याला वाचवायला आईने शेततळ्यात उडी घेतली आणि ती ही त्यात बुडू लागली. हे पाहताच चिमूरड्याच्या वडिलांनीही शेततळ्यात उडी घेतली, मात्र बाहेर पडता येत नसल्यामुळे तिघांचाही या शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.


या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले. यामुळे पती-पत्नी आणि त्यांचा चिमुरडा या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.


या दुर्दैवी घटनेत विजय राजकुमार लोंढे (वय 30) प्रियांका विजय लोंढे (वय 28) प्रज्वल विजय लोंढे (वय 5) या तिघांचा मृत्यू झाला आहे. लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी असून जगण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील एका शेतात सालगडी म्हणून राहत होते. दरम्यान हि दुर्दैवी घटना घडली आहे.