Shivsena Join: युवा नेतृत्व वैभव ठाकरे यांचा 'मशाल' हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश!

Bhairav Diwase
चिमूर:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, चिमूरमधील तरुण आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपसरपंच वैभव ठाकरे यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. चिमूर विधानसभा संपर्कप्रमुख दीपक दादा कदम यांच्या हस्ते वैभव ठाकरे यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित आखाडे, विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते यांच्यासह चिमूर शिवसेनेचे अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते.


पक्षात प्रवेश केल्यानंतर वैभव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी ते यापुढे शिवसेनेच्या माध्यमातून संघर्ष करतील. गावातील विकासकामे आणि विशेषतः युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याला त्यांचे प्राधान्य असेल.


वैभव ठाकरे यांच्या या प्रवेशामुळे चिमूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बाजू अधिक मजबूत झाली आहे. आता आगामी काळात या नवीन नेतृत्वाचा शिवसेनेला किती फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.