
चंद्रपूर:- शहरातील भानापेठ येथे साधूच्या वेशात आलेल्या व्यक्तीने एका डॉक्टर महिलेची ४ ग्राम सोन्याची अंगठी गिळंकृत करीत पळ काढला. याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस त्या साधूच्या वेशात आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे.
२२ मार्चला शहरातील भानापेठ मधील डॉ. उत्तरवार यांच्या आयुर्वेद चिकित्सा क्लिनिक मध्ये दुपारच्या सुमारास ४० वर्षीय काळे कपडे घातलेले साधूच्या वेशातील पगडी घातलेले व्यक्ती व १३ वर्षीय मुलगा आला. त्या दोघांनी डॉक्टरांना पिण्यासाठी पाणी मागितले. त्या साधूने डॉक्टरांना १०० रुपये मागितले, शंभर रुपये दिल्यावर त्या व्यक्तीने गणपतीच्या मूर्ती ठेवलं ओम नमः शिवाय म्हणायला लावले. आणि तुम्ही हे पैसे जिथून आणले त्यातील पुन्हा काही पैसे आणा असे म्हटले डॉक्टरांनी त्या व्यक्तीला हजार रुपये आणुन दिले, डॉक्टर महिलेच्या बोटातील अंगठी कडे लक्ष देत ती अंगठी या पैश्यात ठेवा असे सांगितले. पैश्यात अंगठी ठेवल्यावर त्या व्यक्तीने पैश्यासह अंगठी गिळंकृत केली.
माझी अंगठी मला परत द्या असे महिलेने म्हटल्यावर ती माझ्या पोटात गेली आहे कशी निघणार त्रिशूल नि पोट फाडावे लागणार असे म्हणत त्या व्यक्तीने तिथून पळ काढला. डॉक्टर महिलेने त्या व्यक्तीचा पाठलाग केला मात्र ते पळून गेले. याबाबत डॉ. उत्तरवार यांनी शहर पोलीस ठाण्यात त्या अनोळख्या व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे
