Police Bharati: प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रूपालीची वर्दीला गवसनी!

Bhairav Diwase
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर अनेक तरुण-तरुणी आपले स्वप्न पूर्ण करत आहेत. अशाच एका प्रेरणादायी कहाणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऐमर्स अकॅडमी स्पर्धा पारिक्षा मार्गदर्शन केंद्र गडचांदूरची विध्यार्थिनी रुपाली अनिल टेकाम हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अखेर पोलीस भरतीत यश मिळवत खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार केले आहे.तिने नागपूर ग्रामीण पोलीस विभागामध्ये एस. टी. प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले.


रूपालीचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. रुपाली कोरपना तालुक्यातील कवठाळा या गावची रहिवासी असून तीचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून जेमतेम शेती व्यवसायावरच त्यांना आपली उपजीविका करावी लागत आहे. तरी सुध्या आपल्या मुलीच्या स्वप्नांना यांनी बळ दिले.परिस्थितीमूळे शिक्षण घेताना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही तिने हार न मानता अभ्यास सुरू ठेवला. 


तिचे प्राथमिक शिक्षण कवठाळा यागावी तर पदवीचे शिक्षण गडचांदूर येथे झाले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिच्या मनात खाकी वर्दीविषयी आवड निर्माण झाली. व ते परिधान करण्याचे प्रयत्न तिने सुरु केले. अनेक आर्थिक सामाजिक अडचणींना सामोरे जाऊन शेवटी तिच्या अथक परिश्रमाला यश मिळाले आणि नागपूर पोलीस भरतीमध्ये तिची निवड झाली. तिने भरती मध्ये 150 पैकी 129 गुण मिळवून एस. टी. प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळविला तिच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावातही तिचे कौतुक होत आहे.तिने या यशाचे श्रेय आई, वडील, व ऐमर्स अकॅडमीचे संचालक प्रा. नानेश्वर धोटे ,प्रा. ऐजाज शेख व आप्तजणांना दिले. कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे रूपालीने सिद्ध केले आहे.