Chandrapur News: ताडोबाच्या मोहुर्ली गेटवरच वाघाचे 'शाही' दर्शन! सफारीआधीच पर्यटकांची लॉटरी, बघा व्हिडिओ...

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आज पर्यटकांना आश्चर्याचा धक्का बसला! जंगल सफारीसाठी मोहुर्ली गेटवर पर्यटकांची गडबड सुरू असतानाच, अचानक थेट गेटवरच वाघाचे दर्शन झाले. 'तो' रुबाबात चालताना दिसताच पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
ताडोबात वाघ पाहण्यासाठी पर्यटक हजारो रुपये खर्च करून सफारी करतात. मात्र, आज सफारीला जाण्याआधीच, गेटवरच वाघ दिसल्याने पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी ठरली. काहींनी हा क्षण मोबाईलमध्ये कैद केला. वाघाला इतक्या जवळून पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती. यामुळे ताडोबातील पर्यटकांचा उत्साह आणखी वाढला आहे.