चंद्रपूर:- ज्या उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला होता आणि ज्यांची तात्पुरती निवड यादीत नाव आले आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी ६ एप्रिल २०२६ रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील एकूण २१५ पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
ही पडताळणी दिनांक १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील ड्रिलशेड मध्ये होणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांनी सोबत काय ठेवावे?
१. आवेदन अर्जात नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे (Original Documents)
२. सर्व मूळ कागदपत्रांच्या दोन साक्षांकित छायांकित प्रती (Two sets of Attested Xerox)
३. ५ पासपोर्ट साईज फोटो


