चंद्रपूर:- स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय यश मिळवून देणाऱ्या चंद्रपूरच्या उड़ान करिअर अकॅडमीचा ‘यशोत्सव सोहळा’ आज अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आगामी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
दिनांक ०३ मे २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता जुनोना रोडवरील पॅरिस लॉन, बाबुपेठ, चंद्रपूर येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नरेश उरकुडे साहेब (पोलिस उपनिरीक्षक, पो.स्टे. दुर्गापूर) यांनी भूषविणार आहेत. तर भूषण पाटील साहेब (पोलिस उपनिरीक्षक, पो.स्टे. रामनगर) आणि सौरभ साळुंखे साहेब (पोलिस उपनिरीक्षक, पो.स्टे. रामनगर) यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाला राकेश ठाकरे सर (कर सहाय्यक, मुंबई) आणि प्रतिक बोंडे सर (आरोग्य विभाग, गडचिरोली) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उडान करिअर अकॅडमीचे संचालक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे सर, प्रा. सलाम सर आणि इंजि. धोडरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्वरूची भोजनाची (प्रीतिभोज) व्यवस्था करण्यात आली आहे. अकॅडमीच्या या यशोत्सव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.



