BJP Chandrapur: भाजपा चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणी जाहीर

Bhairav Diwase
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण)चे जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांनी जिल्हा कार्यकारिणी, विविध मोर्चे तसेच पक्षाच्या ४३ प्रकोष्ठांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. नव्या कार्यकारिणीत अनुभवी तसेच युवा कार्यकर्त्यांना संधी देत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे.


जिल्हा महामंत्री म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे, बृजभूषण पाझारे आणि नीलम सुरमवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी रमेश राजुरकर, रेणुका दुधे, सुनील उरकुडे, निलम राचलवार, साकेत भानारकर, सिकंदर शेख, गीताताई लिंगायत आणि ज्योती वेलके यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी अरविंद नंदुरकर, रोहिणी देवतळे, काशीनाथ सिंह, रमेश बोरकर, देविदास ताजणे, विजय आगरे, रोशन ठेंगणे आणि रोहिणीताई पहाणपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सिंघवी यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची तर प्रशांत विघ्नेश्वर यांच्याकडे प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


जिल्हा कार्यकारिणीत विविध विधानसभा क्षेत्रांतील सदस्यांचा समावेश करण्यात आला असून संघटनात्मक विस्ताराला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा आणि किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.


भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तनय देशकर यांची निवड करण्यात आली असून अमित गुंडावार, यश बांगळे, राकेश ठाकरे, अमोल थेरे, साईश वारजुरकर आणि आशीष ताजणे यांची महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी विजयाताई डोहे यांची निवड करण्यात आली असून प्रिया लांबट, लक्ष्मी सागर, वंदना सिन्हा, कोमल फरकाडे आणि मुग्धा खांडे यांच्यावर महामंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. किरण कापगते यांची कार्यक्रम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अरुण मडावी, महामंत्री अशोक आलाम, गणपत नैताम, शुभम गेडाम, जगदीश शेडमाके, बाबुराव मडावी अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद खोब्रागडे, महामंत्री मोरेश्वर खैरे, कांताताई ढोके, रवी मेश्राम, प्रणिता शेंडे ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश महाजन, महामंत्री बबन निकोडे, अरुण शेंडे, हनुमान काकडे, मारुती गायकवाड, शिवानी अगडे अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सय्यद चांद पाशा, महामंत्री जहांगीर कुरेशी, रजिया कुरेशी, अकबर बैहरम खान पठाण
आणि किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी बंडू गौरकार, महामंत्री वाघुजी गेडाम, प्रमोद कडसकर, सुभाष पिंपळशेंडे, देवानंद महाजन, राजू घरोटे यांची निवड करण्यात आली आहे.


याशिवाय पक्षाच्या विविध सामाजिक, व्यावसायिक आणि संघटनात्मक घटकांशी समन्वय साधण्यासाठी ४३ प्रकोष्ठांचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कायदा (विधी) सेलसाठी ॲड. आशीष धर्मपुरीवार, बुद्धिजीवी सेलसाठी प्रा. अरुण रहांगडाले, उद्योग आघाडीसाठी जीवन कोन्तमवार, वैद्यकीय सेलसाठी डॉ. सागर वझे, सहकार आघाडीसाठी अजय गोगुलवार, शिक्षक प्रकोष्ठासाठी भास्कर तिजारे, व्यापारी सेलसाठी शिव सारडा, कामगार प्रकोष्ठासाठी रुद्र नारायण तिवारी, भटके विमुक्त प्रकोष्ठासाठी गुरुदास कामडी, दिव्यांग प्रकोष्ठासाठी श्रीराम पान्हेरकर, अध्यात्मिक प्रकोष्ठासाठी शैलेन्द्रजी शुक्ला, दक्षिण भारतीय प्रकोष्ठासाठी येलय्या दासरफ, ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठासाठी सतविंदरसिंह दारी, जैन प्रकोष्ठासाठी हेमंत सिंघवी, ज्येष्ठ कार्यकर्ता प्रकोष्ठासाठी बाबा भागडे, आयुष्यमान भारत प्रकोष्ठासाठी विक्की लाडसे, ग्रामीण विकास प्रकोष्ठासाठी होमदेव मेश्राम, सोशल मीडिया प्रकोष्ठासाठी अशोक पटेल, आयटी सेलसाठी राहुल दागमवार, रेल प्रवासी प्रकोष्ठासाठी महेश झिटे, अभियंता प्रकोष्ठासाठी जगदीश लवाडिया, प्रिंट मीडिया प्रकोष्ठासाठी श्रीनिवास कंदुकुरी, केमिस्ट प्रकोष्ठासाठी गोवर्धन चंदे, कोचिंग क्लासेस प्रकोष्ठासाठी प्रवीण विघ्नेश्वर, शिक्षण संस्था प्रकोष्ठासाठी गिरीश चांडक, तांडा वस्ती प्रकोष्ठासाठी ओम पवार, क्रीडा प्रकोष्ठासाठी राकेश तिवारी, केरळ प्रकोष्ठासाठी कुमार करण के. बेन्नी, मच्छीमार प्रकोष्ठासाठी शरद सोनवणे, बुनकर प्रकोष्ठासाठी विनोद नंदुरकर, उत्तर भारतीय प्रकोष्ठासाठी मन्ना महाराज (सतीश त्रिवेदी), पदवीधर प्रकोष्ठासाठी अजय काबरा, सेवाभावी संस्था प्रकोष्ठासाठी भोजराज नवघडे, फ्रेंड्स ऑफ बीजेपी प्रकोष्ठासाठी मनोज सोंगलकर, बंगाली समाज प्रकोष्ठासाठी अजय सरकार, सुशासन प्रकोष्ठासाठी अजित मंगळगिरीवार, वाहतूक प्रकोष्ठासाठी आकाश ठुसे, माजी सैनिक प्रकोष्ठासाठी प्रवीण चिमुरकर, राजस्थानी प्रकोष्ठासाठी महेंद्र मंडलेचा, सांस्कृतिक प्रकोष्ठासाठी रविंद्र वांढरे, नगर विकास प्रकोष्ठासाठी डॉ. किरण देशपांडे, आर्थिक प्रकोष्ठासाठी अतुल झांजरी तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासाठी उज्वला जयपुरकर यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे, पक्ष संघटना अधिक सक्षम करणे आणि आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे हे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले.


नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार कीर्ती कुमार भांगडिया, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अविनाश वारजूरकर, राजेंद्र गांधी, विजय राऊत, प्रमोद कडू, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, कृष्णा सहारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले,अलका आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर, गणेश तळवेकर, वनिताताई कानडे आदींनी अभिनंदन केले आहे.