Railway Loco Pilot Career: भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंगबद्दल!

Bhairav Diwase
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न दरवर्षी लाखो तरुण पाहतात. यामध्ये ‘लोको पायलट’ (Railway Loco Pilot) ची नोकरी ही सर्वात जास्त आकर्षित करणाऱ्या पदांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की लोकोपायलट बनण्यासाठी काय करावे लागते? चला तर मग जाणून घेऊया या पदासाठी पात्रता, परीक्षा प्रक्रिया आणि परिक्षण प्रक्रिया ..

लोको पायलट कोण असतो?

लोको पायलट हा रेल्वेचा असा कर्मचारी असतो जो ट्रेनचे संचालन करतो, आणि ट्रेन सुरक्षितपणे ठरवून दिले्लया गतीने आणि वेळेनुसार धावेल याची खात्री करतो. त्याला ट्रेन चालवण्याव्यतिरिक्त रेल्वेचे सिग्नल आणि सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे लागते.

रेल्वेमध्ये सामान्यता करिअरची सुरुवात ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) या पदापासून होते. अनूभव आणि परीक्षांच्या आधारे कर्मचारी पुढे सीनियर लोको पायलट आणि इतर उच्च पदांपर्यंत पोहचू शकतो.

१२ वीनंतर लोको पायलट कसे बनू शकता?

लोको पायलट बनण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याने आयटीआय (ITI) किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल यांसारख्या विषयातून इंजिनियरिंग असणे गरजेचे आहे.

रेल्वे भरती बोर्डाची (RRB) परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक

लोको पायलट बनण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाकडून आयोजित केलेली ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यशस्वी उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कडक मेडिकल टेस्ट केली जाते.

वयोमर्यादा: या पदासाठी सामान्य प्रवर्गातील (General Category) उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षाच्या दरम्यान असावे. याव्यतिरिक्त आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सुट मिळते.

निवडीनंतर दिले जाते विशेष प्रशिक्षण (Special Training)

उमेदवाराने परीक्षा यशस्वी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम त्याची ‘असिस्टंट लोको पायलट’ म्हणून नियुक्ती केली जाते. त्यानंतर रेल्वेच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये तांत्रिक आणि परिचालनाशी संबंधित विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ट्रेनी संचालनाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.