Bhadrawati News: भद्रावतीत एमडी ड्रग्जसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

Bhairav Diwase

भद्रावती:- भद्रावती शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईदरम्यान भद्रावती पोलिसांनी बसस्थानक परिसरातून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून ५. २१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर आणि रिअलमी कंपनीचा मोबाईल असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७०२/२०२६ अन्वये अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यातील कलम ८(क), २२(ब), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती बसस्थानक परिसरात एक मुलगा एमडी ड्रग्ज बाळगून असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून संशयित विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ५. २१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर, ज्याची किंमत सुमारे १३ हजार रुपये आहे, तसेच १० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.


ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात सपोनि विरेंद्र केदारे, सपोनि संजय मिश्रा, पोउपनि संतोष केदार, पोउपनि गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आष्टुनकर, गोपाल आतकुरवार, पोलीस अंमलदार खुशाल कावडे, संतोष राठोड, योगेश घाटोळे तसेच चालक म. पो. अं. ६०२६ यांच्या पथकाने केली.