चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात खाजगी शाळांकडून होणाऱ्या मनमानी आणि अवाजवी फी वाढीविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या वतीने मा. जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
खाजगी शाळांच्या सतत वाढणाऱ्या फी मुळे सर्वसामान्य पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. शिक्षणाचे होणारे बाजारीकरण थांबवून फी नियंत्रणासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका या निवेदनाद्वारे मांडण्यात आली.
यावेळी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार तथा काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, NSUI महाराष्ट्र प्रदेश सचिव आशिष सुधाकर बोंडे, मनीष दास, रामकृष्ण भैय्या, शहजाद भैय्या, प्रकाशजी खुटेमाटे, सचिन हरणे आणि शुभम रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवेदन देताना वैभव बेंद्रे, महेंद्र खेकरे, स्वप्निल चिंवडे, पुलिकेश मोरे, रजत वडस्कर, जय हरणे, प्रणय श्रीरामे, मयूर श्रीराम, नयन महिलावर, हर्षित रामटेके यांच्यासह NSUI चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी आणि पालकांच्या न्याय्य हक्कासाठी NSUI चा हा लढा आगामी काळात असाच तीव्रतेने सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
