Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

Bhairav Diwase
ब्रम्हपुरी:-
ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोधी वन परिक्षेत्रातील आलेवही बीटातील कक्ष क्रमांक ९४ मध्ये अज्ञात रेल्वेच्या धडकेत आठ वर्षे वयाच्या मादा अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. त्या परिसरात काम करणाऱ्या मजुरांना सकाळी रेल्वे लाईनच्या बाजुला अस्वल मृत्यू झालेल्या अवस्थेत आढळून आली. याची माहिती तळोदी वन विभागाला देण्यात आली.


उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी मार्गदर्शनात यांच्या सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्या निदर्शनात क्षेत्र सहाय्यक डॉ. महेश गायकवाड, तेजस सूर्यवंशी, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा अरविंद मने, वनरक्षक बांगर यांनी स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर व स्वाब चे बचाव दल प्रमुख जीवेस सयाम यांचे उपस्थितीत घटनास्थळी जाऊन मोका पंचनामा केला व शवविच्छेदनाकरिता सावरगाव येथील वन आगार मध्ये मृत अस्वलाला आणण्यात आले. यानंतर डॉ. सतीश तांबे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नागभीड, डॉ. ईशा आकरे, डॉ. कुंदन पोचलवार यांनी अस्वलीचे शव विच्छेदन केले. 


यावेळी अस्वलाच्या रेल्वेच्या जोरदार धडकेमुळे आंतरिक भागातील तुटलेल्या जोरदार धडकेमुळे आतारक भागातील तुटलेल्या बरगड्या अंतरिक जखमांवरून अस्वलाचे मृत्यू हे रेल्वेच्या धडकेत झाले असल्याचे निष्कर्ष निघाले.