gadchiroli News: निष्काळजीपणा भोवला; गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित

Bhairav Diwase
गडचिरोली:- मुख्यमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांना भोवला आहे.


 गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडताना अक्षम्य निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. १६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन आदेशानुसार डॉ. लहाडे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.
कार्यपद्धतीविरोधात गडचिरोलीत तक्रारी समोर


निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय सामान्य रुग्णालय, गोंदिया राहणार आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. डॉ. लहाडे यांची डिसेंबर २०२५ मध्ये गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात गडचिरोलीत तक्रारी समोर आल्या होत्या. अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या राजीनाम्यापासून ते रुग्णसेवा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.