Chandrapur News : बावनकुळे-वडेट्टीवारांमध्ये गोट्यांवरून राजकीय टोलेबाजी!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यात गोट्यांच्या विधानावरून राजकीय टोलेबाजी रंगली आहे. वडेट्टीवारांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी २०२९ मध्ये ब्रम्हपुरी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या डोळ्यांच्या गोट्या काढून खेळायच्या आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाल्याचा संदर्भ देत बावनकुळे यांनी त्यांच्यावर पलटवार केला. “२०२९ मध्ये ब्रह्मपुरीत वडेट्टीवारांच्या गोट्या काढून आम्ही खेळणार आहोत. आमच्या डोळ्यांच्या गोट्या खेळणारे अजून कोणीही तयार झालेले नाही,” असा टोला बावनकुळे यांनी लगावला.


यावेळी त्यांनी ब्रम्हपुरीच्या निवडणुकीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. ब्रम्हपुरीची निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित पदवीधर मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी हे विधान केले. त्यामुळे बावनकुळे आणि वडेट्टीवार यांच्यातील राजकीय वाक्‌युद्ध पुन्हा चर्चेत आले आहे.