Chandrapur News : मतदानाच्या दिवशी २३ ऑक्टोबरला मद्यविक्री बंद!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात २३ ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या संपूर्ण दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नमुना सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2/सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल/बीआर-2, टड – 1 या अनुज्ञप्त्या 23 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहील, याची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.