Chandrapur police : अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी चंद्रपूर पोलिस ॲक्शन मोडवर

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
अंमली पदार्थांची अवैध वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली आहे. एनडीपीएस सेल अंतर्गत २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आंध्र प्रदेश ते दिल्लीदरम्यान धावणाऱ्या आंध्र प्रदेश एक्सप्रेस रेल्वेची अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेसह जीआरपी, आरपीएफ आणि श्वान पथक सहभागी झाले होते. यासोबतच आंध्र प्रदेशातून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचीही तपासणी करण्यात आली.


अंमली पदार्थांची अवैध वाहतूक आणि तस्करीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या वतीने अंमली पदार्थविरोधी अभियानांतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. तसेच, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वान पथकाच्या मदतीने आंध्र प्रदेशातून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचीही अचानक तपासणी करण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीद्वारे होणाऱ्या अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.


अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने राबवलेल्या या विशेष तपासणी मोहिमेमुळे वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेवर भर देण्यात आला आहे.