चंद्रपूर:- चंद्रपुरात अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समतानगर, तुकुम येथे एका घरात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या ११ जणांना पकडण्यात आले असून, रोख रकमेसह तब्बल १२ लाख ६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरातील समतानगर, तुकुम परिसरात अवैध जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजून ५० मिनिटांनी संबंधित घरावर छापा टाकला.
राजेंद्र सोमाजी रायपुरे याच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. या ठिकाणाहून एकूण ११ जणांना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती, वेकोलिमधील कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचारी आणि इतर व्यक्तींचा समावेश असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद आहे.
(1) शैलेश गंगाधर पोडल्लीवार वय-50 वर्षे, धंदा- नोकरी (शिक्षक जिल्हा परिषद) रा. छत्रपती नगर चंद्रपुर,
(2) रंजु कालीदास दुर्योधन वय-54 वर्षे, काम-ऑटो चालक, राह. वैद्यनगर, मेजर गेट जवळ चंद्रपुर,
(3) इंद्रजीत सोमाजी रायपुरे वय 58 वर्षे, काम-मजुरी, राह. तुकडोजी नगर तुकुम चंद्रपुर,
(4) राजेंद्र सोमाजी रायपुरे वय- 53 वर्षे, राह मजुरी, राह. एसटी वर्कशॉप तुकुम चंद्रपुर,
(5) राजेश्वर पोचम दुर्गे वय- 48 वर्षे, काम- नौकरी (डब्ल्युसीएल) रा. भिवापुर वॉर्ड गुरनुले वाडी चंद्रपुर,
(6) लतीत उर्फ क्षितीज बाकाराम देशपांडे वय-48 वर्षे, काम- खाजगी नौकरी, राह. छत्रपती नगर तुकुम चंद्रपुर,
(7) अनिल यशवंत बनकर वय 65 वर्षे, काम रिटायर डब्ल्यूसीएल, राह. सिनाळा, ता.जि. चंद्रपुर,
(8) किशोर वसंता पारखी वय-49 वर्षे, काम नौकरी (डब्ल्युसीएल) राह. इंदीरानगर हनुमानमंदीर जवळ वार्ड नं. 03, चंद्रपुर,
(9) सुनिल रामचंद्र नगराळे वय-63 वर्ष, काम रिटायर डब्ल्यूसीएल, राह. एसबीआय कॉलनी तुकुम चंद्रपुर,
(10) संजु खुशाल दुर्योधन वय-38 वर्ष, काम नौकरी (डब्ल्यूसीएल) राह. डब्ल्यूसीएल कॉलनी क्वाटर नं. एम-138 शक्तीनगर दुर्गापुर, चंद्रपूर
(11) विजय गजानन रायपुरे वय-55 वर्ष, काम नौकरी (डब्ल्यूसीएल) राह. समता कॉलनी तुकुम चंद्रपुर
या कारवाईदरम्यान रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ६ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रामनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार अड्ड्यांचे धाबे दणाणले आहेत.

