Nagbheed News : पाण्याअभावी धानपीक करपले; शेतकऱ्याने शेतात फिरवला ट्रॅक्टर!

Bhairav Diwase

नागभीड:-
पावसाने दडी मारली… शेतातील उभे धानपीक पाण्याअभावी करपले… आणि मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक डोळ्यांदेखत वाळून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यावर अखेर शेतात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे.

ही दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तुकूम येथे घडली आहे. येथील शेतकरी माणिक डोईतरे यांनी मोठ्या मेहनतीने धानपीक उभे केले होते. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने आणि पाण्याअभावी धानपीक वाळून गेले. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नाची आशा मावळल्याने त्यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर चालवला.


या घटनेमुळे पावसाच्या अनियमिततेचा आणि पाण्याच्या टंचाईचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची व्यथा पुन्हा एकदा समोर आली आहे. शेतीसाठी केलेला खर्च, घेतलेले कष्ट आणि हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.