Security Guard : सुरक्षा रक्षक पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 12 ऑक्टोबरपासून

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी 12 ऑक्टोबर 2026 पासून कामगार कल्याण मंडळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.


उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ड्रायव्हिंग लायन्सन/मतदान कार्ड/पारपत्र) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा तसेच विशेष अर्हतेची प्रमाणपत्रे (असल्यास) यांची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी एक स्वप्रमाणित छायांकित प्रत सोबत आणावी. उमेदवारांनी मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेल्या, दिनांक व वेळेस अनिवार्यपणे उपस्थित राहावे. अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारास पुन्हा कोणतीही संधी देण्यात येणार नाही व त्याचा पुढील नोंदणी प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.


सदर संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या प्रलोभनास बळी पडू नये अथवा कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.