Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.

Bhairav Diwase. Oct 03, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे दि. 2 आॉक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती जागतिक अहिंसा दिन म्हणून मोठ्या उत्साहात महाविद्यालयात साजरी करण्यात आली. व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर, प्रा. संतोष कुमार शर्मा सर, डॉ. अनंत देशपांडे सर डॉ. सुशिलकुमार पाठक सर एन. एस. एस. अधिकारी आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर हुंगे सरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांना उजाळा दिला आणि त्यांच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल माहिती सांगितली. विसाव्या शतकात अहिंसेच्या मार्गाचा वापर करुन जगाला प्रेम शिकविणारा महात्मा असे सांगितले. त्याचप्रमाणे प्रा. संतोष कुमार शर्मा सर आणि डॉक्टर अनंत देशपांडे सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम शासनाच्या व विद्यापीठाच्या नियमाचे पालन करून फिजिकल डिस्टंसिंग च्या माध्यमातून तोंडावरती मास्क बांधून व सॕनिटाईझर चा उपयोग करून आणि सोशल डिस्टसिंग पाळ हा कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतत्तर कर्मचारी यांचे मोठे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने