छत्तीसगड मध्ये नेटबाॅल स्पर्धेत झाला सहभागी.
पोंभुर्णा:- छत्तीसगड येथे होत असलेल्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत पोंभुर्णा शहरातील शैलेश टेकाम हा महाराष्ट्र राज्यातील टिममध्ये सहभागी झाला असुन या निमित्ताने पोंभुर्णा हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. पोंभुर्णा तालुक्यातुन शैलेश चे कौतुक होत असुन तो राष्ट्रीय संघातून खेळुन गावाचे व तालुक्यातचे नाव लौकीक करावे अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.