Top News

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार #chandrapur #gadchiroli


Google ads.
चंद्रपूर:- यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2023 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदीलगतची सर्व गावे व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरुनी नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदी घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे, बॅरेज परिसरातील गावकऱ्यांनी व नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे,असे आवाहन लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जुन 2018 मध्येच पूर्ण झाले असून सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरचे बाजूस 4 किलोमीटर वर आहे. बॅरेजची एकूण लांबी 691 मीटर असून 15 मीटर लांब × 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहे. दि. 15ऑक्टोबर 2022 पासून संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले होते.

चिचडोह बॅरेजच्या बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधित होणाऱ्या व नदीकाठावरील गावे:

चिचडोह बॅरेजच्या बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधित होणाऱ्या व नदी काठावरील गावांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, चामोर्शी तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायत अंतर्गत कुरुड व रामपूर, विसापूर ग्रामपंचायतीअंतर्गत विसापूर, निमगाव, खोर्दा व हिवरगांव तसेच तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगाव (रै), आमगाव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, दोटकुली तर गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव(बु.), शिवणी, मुडझा(बु.) व पुलखल आदी गावे तर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याअंतर्गत हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेंगाव, कापसी व उपरी आदी गावांचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने