Top News

भारतीय जनता पार्टीतर्फे विविध ठिकाणी मास्क व सेनिटायझर वाटप.

सेवा देणाऱ्या कोणत्याही कर्मचारी तसेच नागरिक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व सुरक्षित राहावे म्हणून.
Bhairav Diwase.   April 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक उपाय योजना करीत आहे.आणि आज पर्यंत अनेक संस्था जीवनावश्यक वस्तु,मास्क,साबुन इत्यादी देऊन सहकार्य करीत आहेत.त्याचप्रमाणे सावली तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने  विविध ठिकाणी मास्क व सॅनीटिझर चे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार व शहर अध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत संतोषवार व आधी भाजपा कार्यकर्ते उपस्थिती होते. मास्क व सेनिटायझर देण्याचे कार्य भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांनी सुरु ठेवलेले आहे.सेवा देणाऱ्या कोणत्याही कर्मचारी तसेच नागरिक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व सुरक्षित राहावे म्हणून भाजपा च्या कार्यकर्त्यांनी  हा उपक्रम तालुक्यात सुरु ठेवलेला आहे.सामान्य व्यक्तीचा व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संपर्क  येत असतांना दोघांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून मागील अनेक दिवसापासून हा उपक्रम तालुक्यात राबवितांना दिसत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने