Top News

पत्रकारावर रेती माफियाने केला हल्ला व्याहाड बुज येथील घटना.

पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना तक्रार देवून या माफियांवर कठोर कारवाई व्हावी असे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघानी म्हटले.
Bhairav Diwase.   April 21, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: सावली तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तालुका सावली चे सदस्य अनिल तुळशीराम गुरुनुले वय ४९ व्याहाड बुज यांचेवर दि.२१ एप्रिल ला सकाळी ६.३०च्या सुमारास रेती माफियांनी हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.
 सदर पत्रकार शेतीचे काम करीत असल्यामुळे रोजच्या प्रमाणे आपल्या शेतीची पाहणी करण्याकरिता गेले असता ट्रॅक्टर चा आवाज आल्यामुळे आवाजाच्या दिशेने नहराकडे गेले तर तिन ट्रक्टर रेती आनतांना दिसले. वृतसंकलनासाठी आपल्या मोबाइल नी शूटिंग व फोटो घेऊन जात असतांना रेती माफिया रेमाजी ईश्वर पेंदोरकार व इतर चार माफियांनी येऊन मोबाइल हिसकावून शुटिंग घेतलेली क्लिप डिलेट करून मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.जर यपुढेही कुणाचाही गाडीचे फोटो अथवा विडिओ क्लिप बनविल्यास तुला ठार मारण्यात येईल अशा धमक्या देत अश्लील शिविगाळी केली.  तर या माफियाची मजल इथेच न थांबता रेमाजी पेंदोरकरचे भाऊ देवानंद ईश्वर पैंदोरकर रा.व्याहाड बुज,गुरुदास झाडे व जुवारे रा.सामदा बुज यांनी पत्रकाराच्या घरी जाऊन तू आमच्या गाडीची शुटिंग घेतला कसा आणि आम्ही तुला पाहून घेऊ अशा धमक्या दिल्या आहेत. हे गुंडप्रवृतीचे रेती व दारू तस्कर असल्यामुळे आणि सदर पत्रकाराचा व्यवसाय शेती असून शेतावर अथवा बातमी संकलना करीता जात असतात त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना तक्रार देवून या माफियांवर कठोर कारवाई व्हावी असे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघानी म्हटले आहे.
तालुक्यात अधुन मधून पत्रकारावर हल्ले होण्याच्या घटना होतांना दिसतात,पत्रकार समाजाला दिशा दाखविण्याचे काम करीत असतांना असेच हल्ले होत राहिले तर पत्रकाराच्या सुरक्षेचा काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
जगभरात कोरोनाचे संकट आले तेव्हापासून या संघाने तालुक्यात अनेक उपक्रम राबवून प्रशासनाला व जनतेला जनजागृती व सहकार्य केले हे विशेष.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने