Top News

कोरोना ग्रस्तांच्या मदतीला सरसावले ‘नगरसेवक’. पोंभुर्णा तहसीलदारांना सुपृद केला धनादेश

∆ मुख्यमंत्री साहाय्य निधीत दहा हजाराची दिली मदत. ∆ नगरसेवक जयपाल गेडाम यांनी जपले देशहित.
    Bhairav Diwase.   April 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे. पोंभुर्णा नगरपंचायत चे जबाबदार नगरसेवक जयपाल गेडाम यांनी दहा हजार रुपयाचा धनादेश देवून कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी पोंभुर्णा तालुका सहाय्यतेला मदत केली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे पोंभुर्णा तहसीलदारांनी केलेल्या आवाहनास आता प्रतिसाद मिळत असून या आवाहनास प्रतिसाद देत अनेक मदतगार व्यक्तींनी सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे. आज प्रामुख्याने पोंभुर्णा शहरातील प्रसिद्ध अतूल ग्रामीण गँस वितरक चे मालक व नगरपंचायत नगरसेवक जयपाल गेडाम यांनीनी 10 हजाराचा धनादेश तहसीलदार पोंभुर्णा यांना सुपृद करुन अनेक धनदांडग्या समोर आपली छाप सोडली आहे. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमेटीचे तालुक अध्यक्ष कवडू कुंदावार, यांची प्रमुख उपस्थितीत तर सामाजिक कार्यकर्ते पराग मुलकलवार यांचीही उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने