Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा च्या रा.से.यो स्वयंसेवक आणि स्वयंसेविकां कडुन गरजुंना जीवनावश्यक वस्तू व मास्कच वाटप.

गोंडवाणा विद्यापीठ, गडचिरोलीच्या अंतर्गत चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उपक्रम.
    Bhairav Diwase.   April 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: देशात कोरोना विषाणूंमुळे हाहाकार माजला असतांना त्याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासन पातळीवरून शर्थीचे प्रयत्न अविरत सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गोंडवाणा विद्यापीठ, गडचिरोली च्या रासेयो विभागाचे संचालक डॉ. नरेश मडावी यानी गरजुना फेस मास्क वाटण्याचे आव्हान समस्त स्वयंसेवकांना केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी घरी स्वतः मास्क बनवुन आपल्या परिसरात गरजू लोकांना वाटप केले. व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. 
     सदर काॅलेजचे प्राचार्य डॉ. टि. एफ. गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा नितीन उपर्वट सर, यांनी रासेयो स्वयंसेवकांना घरी मास्क तयार करून आपआपल्या गावातील परिसरात शासनाकडून मिळालेल्या संपूर्ण नियमांचे आणि सोशल डिस्टेन्सिंगचे काटेकोर आणि तंतोतंत पालन करून  लोकांना कोरोना विषाणू संदर्भात जागृती व प्रतिबंधक माहीती सांगून आवश्यक लोकांना मास्क वितरीत करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करीत स्वयंसेवक आणि स्वयंसेवकानी आपापल्या गावात घरा शेजारील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू व मास्क वितरीत केले.
       तसेच प्रा डॉ पुर्णिमा मेश्राम सांस्कृतिक विभाग, प्रा ओमप्रकाश सोनोने विद्यार्थी विकास विभाग, प्रा विजय बुधे ग्रंथपाल, प्रा डॉ संघपाल नारनवरे शारीरिक शिक्षण निर्देशक व शिक्षकेत्तर कर्मचारी हा कार्यक्रम राबविण्यासाठी सहकार्य करत आहे. याकरिता चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविकानी जीवनावश्यक वस्तूंची व मास्क बनवून वाटप करुन खूप मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने