Top News

चंद्रपुर जिल्ह्यातील आसेगाव येथे श्री संजय उगेमुगे प्राध्यापक चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा यांनी निराधार व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची केली मदत.

लाॅकडाऊनमुळे रिकाम्या हातांना काम नसल्यामुळे सामाजिक बांधलकी या नात्याने आपण ही थोडा सा वाटा उचलावा ह्या हेतूने.
      Bhairav Diwase.    April 20, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: देशात कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका असे सांगितले जात आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. कोरोना व्हायरस मुळे  सर्वत्र लाॅकडाउन स्थिती आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात घोषित करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळच्या अन्नासाठी मोठा प्रश्न भेडसावत आहे. लाॅकडाऊनमुळे रिकाम्या हातांना काम नसल्यामुळे सामाजिक बांधलकी या नात्याने आपण ही थोडा सा वाटा उचलावा ह्या हेतू चंद्रपुर जिल्ह्यातील आसेगाव येथे श्री संजय उगेमुगे प्राध्यापक चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा यांनी निराधार व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. यात तांदूळ, दाळ व तेल पाॅकेट इ. वस्तुंचा समावेश होता. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने