चंद्रपूर येथील गडचांदूर मध्ये क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे पोलिसांवर केला हल्ला.

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
    Bhairav Diwase.    April 19, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपुर: देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरा रहा, सुरक्षित रहा असं सतत सरकार लोकांना आवाहन करत आहे. तरी देखील काही लोक या लॉकडाऊनचे दरम्यान आपलीच मनमानी करताना दिसत आहे. चंद्रपूर येथील गडचांदूर मध्ये अशी खळबळजनक घटना रविवारी घडली आहे. क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्लात पोलिस जखमी झाले असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं?
चंद्रपूर मधील गडचांदूर येथील गुरुद्वारा भागात क्रिकेट खेळले जात होते. तीन दिवसांपासून हे सुरू असल्यामुळे पोलिसांना त्यांना हटकलं. मग सर्वजण तिथून पसार झाले. मात्र जेव्हा पोलिसांनी क्रिकेटचे साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली तेव्हा अविनाश चव्हाण याने आपल्या नातेवाईकांसोबत पोलिसांवर हल्ला केला. हा हल्ला करताना तीन महिलांचा समावेश होता. पोलिस कर्मचारी तिरुपती माने यांना बॅटने मारहाण करण्यात आली. त्यानंतर माने यांना चंद्रपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने