Top News

नगरपंचायत पोंभुर्णा येथील सफाई कामगारांना केमारा-देवाडा जिल्हा परिषदचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या कडून जीवनावश्यक वस्तू व मास्क वाटप.

गोरगरिबांची सेवा करणारे आदरणीय विकासपुरुष लोकनेते मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री वित्त व नियोजन, वनमंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे यांच्या मार्गदर्शना खाली
   Bhairav Diwase.   April 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: देशात कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका असे सांगितले जात आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. कोरोना व्हायरस मुळे  सर्वत्र लाॅकडाउन स्थिती आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात घोषित करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळच्या अन्नासाठी मोठा प्रश्न भेडसावत आहे. लाॅकडाऊनमुळे रिकाम्या हातांना काम नसल्यामुळे सामाजिक बांधलकी या नात्याने आपण ही थोडा सा वाटा उचलावा ह्या हेतूने गोरगरिबांची सेवा करणारे आदरणीय विकासपुरुष लोकनेते मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री वित्त व नियोजन, वनमंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे यांच्या मार्गदर्शन खाली जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या कडून नगरपंचायत पोंभुर्णा येथील सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तू व मास्क वाटप करण्यात आले. पोंभुर्णा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. परंतू त्याच कर्मचाऱ्यांकडे कुणीही लक्ष दिले नाही. परंतु सामाजिक बांधिलकी जपत श्री राहुलभाऊ संतोषवार यांच्याकडून किट वाटप करण्यात आले. श्री राहुलभाऊ संतोषवार गरजू व्यक्ती पर्यंत जाऊन मदत करत आहे. आणि कुणी त्यांच्यापाशी मदत मागायला गेले, तर त्यांना पण मदत करत आहे. भाऊंना कोणी या व्यक्तीला मदतीची गरज आहे, असे सांगितले ते स्वतः मदतीला धावून येतात‌.  मदत करताना भेदभाव करत नाही. जनसामान्यांच्या हितासाठी, जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने