Click Here...👇👇👇

मा सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा सभा क्षेत्र यांच्या कडून भिमणी येथील ज्या गरीब व गरजू कुटुंबाना राशन मिळत नाही त्यांना धान्य व किराणा किट.

Bhairav Diwase
मा देवरावदादा भोंगळे माजी जि प. अध्यक्ष तथा जि प सदस्य यांच्या शुभ हस्ते वाटप.
   Bhairav Diwase.   April 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोभुर्णा: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. आणि. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहोत. संपूर्ण देशात कोरोना विषाणू चा संसर्ग वाढत आहे त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन मजुरीच्या आधारे कुटुंब जगविणाऱ्या लोकांना जीवन जगतांना खूप अडचणी निर्माण झालेल्या असून, दोन वेळा जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये. एक हात मदतीचा आपुलकीचा देत मा सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा सभा क्षेत्र यांच्या कडून पोंभुर्णा तालुक्यातील भिमणी येथील ज्या गरीब व गरजू कुटुंबाना राशन मिळत नाही. त्यांना धान्य व किराणा किट  मा देवरावदादा भोंगळे माजी जि प. अध्यक्ष तथा जि प सदस्य यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कु अल्काताई आत्राम सभापती प. स पोंभुर्णा. मा गजानन गोरंटीवार ता अध्यक्ष भाजपा, विनोद देशमुख प स सदस्य, गंगाधर मडावी प स सदस्य, अजय मस्के ता.अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पोंभुर्णा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.