Click Here...👇👇👇

केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या प्रयत्यांना मोठ यश.

Bhairav Diwase
घनोटी तुकुम येथील ६ मजूरांना वरोरा येथुन स्वगावी आणले.
   Bhairav Diwase.   April 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोभुर्णा: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. आणि. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहोत. संपूर्ण देशात कोरोना विषाणू चा संसर्ग वाढत आहे त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच घनोटी तुकुम येथील ६ मजूर हे वर्धा येथे कामानिमित्त गेले होते.  लोक लॉकडाऊन झाल्यामुळे तिथेच अडकले होते. परंतु ते वर्धा वरुन परत येतांना वरोरा पोलिसांनी त्या मजूरांना ताब्यात घेतले. त्यांना १५ दिवस कारटाईन मध्ये ठेवण्यात आले. परंतु जनसामान्यांच्या हितासाठी, जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी घनोटी तुकुम येथील ६ मजूर हे वर्धा येथे कामानिमित्त गेलेल्याना स्वगावी आणण्यासाठी अथंग परिश्रम घेतले. व आज कारटाईन पूर्ण झाल्यामुळे त्याना शासकीय वाहनाने त्या  सर्व मजुराना स्वगावी आणण्यात आले. श्री. राहुलभाऊ संतोषवार यांच्या प्रयत्नांना मोठ यश आले.