Top News

चंद्रपूर - कोरोनाला रोखण्यासाठी सीमेवर कडा पहारा.

नागपूरकडून येणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यासाठी खांबाडा या जिल्ह्याची सीमा असलेल्या गावी पोलिसांचा कडा पहारा.
   Bhairav Diwase.    April 23, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात आजतागायत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळं या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आलाय. जिल्ह्यातील ही निरोगी स्थिती अशीच कायम राहावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करतेय.याचा प्रत्यय जिल्ह्याच्या सीमांवर येत आहे. बाहेरून कुणीही बाधीत व्यक्ती जिल्ह्यात शिरकाव करता कामा नये, यासाठी सर्व सीमा सील तर केल्या आहेतच, पण तिथं चोवीस तास खडा पहारा दिला जातोय.

नागपूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्यानं या जिल्ह्यातून कुणी येऊ नये, याची मोठी खबरदारी घेतली जात आहे. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर याचा प्रत्यय आला. नागपूरकडून येणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यासाठी खांबाडा या जिल्ह्याची सीमा असलेल्या गावी पोलिसांचा कडा पहारा ठेवण्यात आलाय. चंद्रपूर शहरापासून 70 किमीवर असलेल्या या सीमेवर चोवीस तास बंदोबस्त तैनात असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने