चंद्रपूर: वृत्तपत्र विक्रेत्याना मास्क व डेटॉल साबणाचे वितरण.

घरोघरी पेपर वाटप करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याना ही मदत.
    Bhairav Diwase.    April 23, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपुर महानगरात पेपर वाटप करणारे युवक कोरोना पासून मुक्त राहावे म्हणून माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तपत्र विक्रेत्याना मदतीचा हात दिला आहे. मदत कार्याचे विविध उपक्रम सर्वस्तरावर सुरू असताना गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास किमान १०० पेपर विक्रेत्याना मास्क व डेटॉल साबणचे वितरण संजय गांधी मार्केट येथे करण्यात आले.

चंद्रपुरवासी कोरोना महामारी पासून सुरक्षित रहावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.तसेच गरजू गरीब जनतेच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत.आ. मुनगंटीवार यांनी सुरवातीपासून या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.शक्य असेल ती मदत करण्याचे निष्पक्ष धोरण ठेवत त्यानी (१४ एप्रिल) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभंपर्वावर मास्क व डेटॉल साबण वितरण उपक्रम हाती घेतला.१० हजार साबण व १० हजार मास्कचे वितरण या निमित्ताने करण्यात आले.या उपक्रमाचा एक भाग म्हणून घरोघरी पेपर वाटप करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याना ही मदत देण्यात आली.१९ एप्रिल ला २०० विक्रेत्याना मास्क देण्यात आले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने