Top News

केळझर वनक्षेत्रात आढळला पट्टेदार वाघाचा बछळा.

मूल तालुक्यातील सुशी दाब येथे बघासाठी जमलेल्या गर्दीने उडवला लाॅकडाऊनचा फज्जा.
Bhairav Diwase. April 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
मुल: चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील सुशी दाब गावं येथील अजय शेंडे यांच्या गुरांच्या चाऱ्याच्या गोवाळीत आज सकाळी 6.30 चे दरम्यान एक पटेदार वाघाचा बछडा दिसला. पाहता-पाहता माहिती गावभर पसरली. आणि लागलीच बघ्यांची खूप गर्दी वाढली. जवळपास हजारोच्या वर संख्येने महिला पुरुष छोट्या मुलांसह पाहण्यासाठी जमा झाले. त्यामुळे देशात लागू असलेल्या संचार बंदी, लाकडाऊन चा पूर्णपणे फजा उडाल्याचे दिसून आले वनविभाग व पोलिस चौकी ला कळवले त्या नंतर पोलिस प्रशासना कडून लोकांना हाकलून लावले तर वण विभागांचे चमूनी वाघाच्या बछडा ला पकडून चंद्रपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले.
    गावात जंगलात राहणारे हिंस्र गावठी कुत्रे वावरत असतात अश्याही स्थितीत वाघाचे पिलू गावात सुखरूप दिसल्याने मोठा अनर्थ टाळला. तर त्याला कुत्रानीच पाठलाग केल्याचेही गावात वृत आहे.


त्यावेळी वनरक्षक ठमके, वनरक्षक कावळे, वनरक्षक मरस्कोल्हे, वनविभाग चमू , पत्रकार दुर्वास घोंगडे, चिरोली पोलिस चौकीचे पोलिस आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सदर पिलाच्या मातेला सोधण्या करिता चीचपली वनपरिक्षेत्र अधिकारी राजूरकर, वनपाल खनके, वनरक्षक घाबरगुंडे , ठमके, मरस्कोले, सर्पमित्र व आदी टीम गावाच्या आजू-बाजूला वनात सोध घेत असून लवकर पिलाला त्याच्या अाईजवळ सुफुर्द करणार आहेत.
वाघाचा बछळा गावात आल्याने त्याची माताही गावा शेजारीच असावी असा अंदाज वर्तविला जात असून गावात भीती निर्माण झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने