Top News

पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीची पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात एम. बी. बी. एस. डॉक्टर ची मागणी.

जिल्हा परिषद शासन तथा या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्य यांनी लक्ष देऊन पाथरी येथील समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी पाथरी येथील पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीने केली.
Bhairav Diwase.   May 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी हे नगर परिसरातील मुख्य ठिकाण असून या परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. पाथरी परिसरात जवळपास 35 ते 40 गावे येत असून येथील जनता आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी रोज ये जा करतात. पाथरी येथे एक राष्ट्रीय कृती बँक ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, व जयकिसान ग्रामीण बँक आहे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कुल तथा संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय आहे. परिसरातील विध्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात,  तसेच आर्थिक व्यवहार करणाऱ्याची सुद्धा येथील बँक मध्ये वर्दळ असतें या ठिकाणी इंग्रज कालीन पोलीस स्टेशनं आहे, तसेच शेतीसाठी सिंचन व्यवस्था म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असोला मेंढा तलाव आहे. तलाव निसर्ग सौंदर्याने नटलेले असून या ठिकाणी पर्यटकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्दळ असतें कित्येक वर्षांपासून पाथरी नगरी ला पाथरी तालुक्याचा दर्जा द्यावा अशी मागणी पाथरी येथील पाथरी तालुका निर्माण संघर्ष समिती करीत आहे. अनेकदा बाजारपेठ बंद ठेवून मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीच्या पदाधिकारी यांनी मुंबई येथे जाऊन मंत्रालयात निवेदन सुद्धा दिलेले आहे. या ठिकाणी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या असोला मेंढा तलावाला पर्यटन स्थळ घोषित करून  सौंदर्यीकरण करण्याची मागणी सुद्धा वारंवार होत आहे. अश्या निसर्ग पूर्ण वातावरणात नटलेल्या पाथरी गावाकडे  शासनाचे तथा या परिसरातील प्रतिनिधींचे नेहमीच दुर्लक्ष होताना दिसत आहे. या परिसरातील जनता आरोग्याच्या निमित्ताने वैद्यकीय सेवा घेणेकरिता रोज ये जा करतात. इथली ओ पी डी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या छोट्या आरोग्याच्या समस्येकरिता नेहमीच इथून रुग्णांना बाहेर पाठविल्या जात आहे. या आरोग्य वर्धिनी केंद्रातून  साधारण प्रसूती साठी सुद्धा जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जात आहे. अश्या खूप समस्या असताना पाथरी तालुका निर्माण संघर्ष समिती एम बी बी एस डॉक्टर ची मागणी सातत्याने करीत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. सौं संध्याताई गुरुनुले यांचेकडे सुद्धा ही मागणी समितीचे अध्यक्ष यांनी बरेचदा केलेली आहे. परंतु पाथरी नगरी कडे नेहमीच का दुर्लक्ष केल्या जाते हे समजण्याच्या पलीकडे आहे. तरी जिल्हा परिषद शासन तथा या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्य यांनी लक्ष देऊन पाथरी येथील समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी पाथरी येथील पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीने केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने