Top News

गोंड‍वाना विद्यापीठातील पदभरती प्रक्रिया पुढे ढकलावी – भाजयुमोची मागणी

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतर्फे प्राध्‍यापक, सहाय्यक प्राध्‍यापक आणि सहप्राध्‍यापक या पदांसाठी घेण्‍यात येणारी पदभरती प्रक्रिया पूढे ढकलण्‍याची मागणी भारतीय युवा मोर्चाचे सूरज पेदूलवार आणि प्रज्‍वलंत कडू यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली आहे.
 Bhairav Diwase.    May 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपर:- दिनांक 20 मार्च 2020 च्‍या परिपत्रकानुसार गडचिरोलीच्‍या गोंडवाना विद्यापीठाने प्राध्‍यापक, सहाय्यक प्राध्‍यापक आणि सहप्राध्‍यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली. या पदभरतीसाठी साधारणतः 500 च्‍या जवळपास अर्ज ऑनलाईन स्‍वरूपात आलेले आहे. या 500 उमेदवारांना त्‍यांच्‍या अर्जाच्‍या 11 प्रती विद्यापीठात स्‍वतः आणून देणे किंवा पोस्‍टाने पाठविणे अनिवार्य करण्‍यात आले आहे. लॉकडाऊनच्‍या परिस्‍थीतीमुळे हे केवळ अशक्‍य आहे. त्‍याच प्रमाणे सदर विद्यापीठात पीएचडी शाखेत विद्यार्थ्‍यांचे शोधप्रबंध 15 ते 20 महिन्‍यांपासून प्रलंबित आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतर्फे प्राध्‍यापक, सहाय्यक प्राध्‍यापक आणि सहप्राध्‍यापक या पदांसाठी घेण्‍यात येणारी पदभरती प्रक्रिया पूढे ढकलण्‍याची मागणी भारतीय युवा मोर्चाचे सूरज पेदूलवार आणि प्रज्‍वलंत कडू यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली आहे.
त्‍यामुळे हे विद्यार्थी पीएचडी पात्रतेमुळे सदर पदभरतीसाठी अपात्र ठरले आहेत. हा सदर विद्यार्थ्‍यांवर अन्‍याय आहे. पीएचडी संदर्भातील प्रलंबित प्रक्रिया पूर्ण झाल्‍याशिवाय ही पदभरती प्रक्रिया राबविणे हा सदर उमेदवारांवर अन्‍याय ठरेल. या पदभरती प्रक्रियेशी संबंधित प्रलंबित बाबींचा योग्‍य निपटारा करून लॉकडाऊन संपल्‍यानंतर विद्यार्थ्‍यांना अवधी देवून ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक पध्‍दतीने राबविण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे सूरज पेदूलवार आणि प्रज्‍वलंत कडू यांनी प्रतिपादीत केली आहे.
 
या मागणी संदर्भातील निवेदन आ. सुधीर मुनगंटीवार यांना देण्‍यात आले असून आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी आणि उच्‍चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्‍याशी पत्रव्‍यवहार व चर्चा केली आहे. या संदर्भात योग्‍य तोडगा काढण्‍याचे आश्‍वासन भाजयुमो पदाधिका-यांना दिले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने