Top News

रोटरी क्लब चंद्रपूर च्या वतीने गर्भवती मातांना लोहयुक्त व कॅल्शिअम युक्त खाद्य पदार्थाच्य वाटप.

प्रसवोत्तर मातांना चिक्की राजगीरा लाडू आणि सॅनिटरी नॅपकिनचे वाटप.
Bhairav Diwase.   May 31, 2020
 (आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले, त्यासाठी प्रशासनाकडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान  देत आहे. 
 
त्या पार्श्वभूमीवर सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत सावली येथे दिनांक 30/05/2020 ला मानव विकास कार्यक्रम अंतर्गत गर्भवती माता व नवजात बाळाची  तपासणी स्त्रीरोग तज्ञ डॉ. आसावरी देवतळे मॅडम व बालरोग तज्ञ पेंडाम सर यांचेकडून करण्यात आली. रोटरी क्लब चंद्रपूरच्या अध्यक्षा स्मिता ठाकरे उपसस्थित होते. रोटरी क्लब चंद्रपूर च्या वतीने गर्भवती मातांना लोहयुक्त व कॅल्शिअम युक्त खाद्य पदार्थाच्य वाटप करण्यात आले. व प्रसवोत्तर मातांना चिक्की राजगीरा लाडू आणि सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव असताना नियमित मानव विकास कार्यक्रम अंतर्गत  मातांची व बालकाची काळजी घेतली जात आहे. कार्यक्रमास सौ योगिताताई डबले जि. प. सदस्य, आरोग्य अधिकारी डॉ दीपक जोगदंड सर व वैद्यकीय अधिकारी प्रा.अा. केंद्र जिबगाव डॉ सौरभ गोबाडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने