Top News

केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य, श्री. राहुल संतोषवार यांनी डॉ.पवन चांदेकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान.

केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक arsenic album 30 औषधी वितरण.
Bhairav Diwase.   May 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा:- काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले, त्यासाठी प्रशासनाकडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान  देत आहे. 

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर केमारा देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये डॉक्टर पवन चांदेकर साहेब यांनी गावागावात जाऊन स्व खर्चातून नागरिकांची तपासणी करत आहे. पोंभुर्णा येथील डॉ.पवन चांदेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक arsenic album 30 औषधी वितरण करीत आहेत.  या शिबिरामध्ये गावातील सर्व लोकांनी सहभाग नोंदवित आहेत.
आज केमारा-देवाडा जिल्हा परिषद चे सदस्य, श्री. राहुल संतोषवार यांनी डॉ.पवन चांदेकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. उराडे साहेब, अनुप श्रीकोंडावार उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने