प्राथमिक उपचारानंतर शांताबाई यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या कुलथा येथील 60 वर्षीय वृद्ध महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ही घटना काल (शनिवार) रात्रीच्या सुमारास घडली. शांताबाई मोतीराम मडावी, असे मृत महिलेचे नाव आहे.
शांताबाई घरात एकट्याच राहतात. सापाने चावा घेतला हे लक्षात येताच शांताबाईनी गावकऱ्यांना मदतीसाठी हाक दिली. गावकरी लगेच मदतीसाठी धावून आलेत. गावकऱ्यांनी शांताबाई यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे हलविले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शांताबाईची प्राणज्योत मावळली. शांताबाईच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.