पोंभुर्णा- देवाडा खुर्द मार्गावर बैलगाडी आणि कारचा भिषण अपघात.

Bhairav Diwase
वाहनाच्या भीषण धड़केत सिद्धार्थ पडोळे (शेतकरी) जखमी.
Bhairav Diwase.   June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा पासून १ कि.मी. अंतरावर पोंभुर्णा- देवाडा खुर्द रस्त्यावर आज दि. 21 जून ला सायंकाळी 4 वाजता सुमारास कार आणि बैलगाडीचा भीषण अपघात झाला. या वाहनाच्या भीषण धडकेत सिद्धार्थ पडोळे (शेतकरी) जखमी झाले असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे नेण्यात आले.
   सिद्धार्थ पडोळे हे आपल्या शेतातील कामे आपटुन घरी जायला निघाले. बैलगाडीला देवाळा खुर्द कडून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली असता बैलगाडी दुसऱ्याच्या शेतात फेकली गेली. बैलगाडी मालकाला जबर मार लागला असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे भरती करण्यात आले आहे. बैलगाडी आणि कारच्या धडकेत दोन बैल गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक पशू आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.  या भीषण अपघताची माहिती होताच पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाली. व पुढील तपास पोंभुर्णा पोलीस करीत आहे.