🌾🌾येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींच बाहुल्या बनले आकर्षण.👨🦰👩🦰
🌾🌾प्राणी, पक्षी यांच्यापासुन शेतीचेही खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण
Bhairav Diwase. June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारत देशात शेती जास्त प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील चंद्रपुर जिल्ह्यात जंगल आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जास्तीत जास्त लोक हे शेती करतात. या भागात जंगल असल्यामुळे प्राण्यांचा व पक्ष्यांचा वावर असते. प्राणी, पक्षी शेतीचे नुकसान करतात. त्यासाठी शेतकरी आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी वेगवेगळे प्रकारचे उपयोग करतात. प्राणी, पक्षीना पिकांना नुकसान होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी शेतीमध्ये पाहारा (जागल) करत असतात. अशाच एका व्यक्तीने आपली शक्कल लढवत आपल्या शेतीचा प्राणी पशु यांच्यापासून नुकसान होऊ नये.
यासाठी पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथील श्री रामचंद्र बुरांडे हे रहिवासी असून ते अनेक वर्षांपासून शेती करत आहे. आपल्या शेतात एका एकरामध्ये भाजीपाल्याची लागवड करतात. त्यांना शेतीमध्ये प्राणी, पक्षीपासून खुप त्रास होत होता. शेतीच्या संरक्षणासाठी शेतीमध्ये प्राणी, पक्षीपासून होणारा त्रास हे बघून त्यांनी अतिशय उत्तम उपाय काढले. त्यांनी आपल्या शेतात माणूस-बाई सारखे दिसणारे बाहुल्या तयार केले. ते आपल्या शेतामध्ये ठेवले. प्राणी पशु यांना असं वाटावं की शेतामध्ये खरंच कोणतरी व्यक्ती आहे. त्यामुळे ते प्राणी, पक्षी आपल्या शेताकडे भटकंती करू नये. यासाठी या बाहुल्यांचा वापर केला आहे. तसेच त्यांची शेती रस्त्याच्या कडेने असल्याने माणूस-बाई बाहुल्या व्यक्ती सारख्या दिसत असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नजर त्या बाहुल्या कडे जातात. व्यक्तीच ते बाहुल्या आपल्याकडे आकर्षण करत आहे. आणि प्राणी, पक्षी यांच्यापासुन शेतीचेही खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण होत आहे.