सावली तालुक्यातील जनतेला गडचिरोली साठी सवलत देण्यात यावे:- अनिल गुरनुले यांचे पालकमंत्री यांना निवेदन.

Bhairav Diwase
सावली तालुक्यातील जनतेला गडचिरोली येथे जाने येणे करण्याकरिता विनाअट परवानगी देण्यात यावी.
Bhairav Diwase.   June 23, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- संपूर्ण देशामध्ये कोविड १९ मुळे संचारबंदी लागू आहे,  त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे . या कोरोना च्या संसर्गामुळे महाराष्ट्रात जिल्हा बंदी  घोषित झालेली आहे. त्यातच आपले चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे सुद्धा आंतर जिल्हा बंदी आहे.  याचा फटका सावली तालुक्याला बसत आहे.
          सावली तालुका हा गडचिरोली मुख्यालयापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर आहे. सावली तालुक्यातील जनता ही किराणा, शेतीविषयक कामे, व्यवसायासाठी , मजुरी व इतर विषयक कामे करण्यासाठी सदैव गडचिरोली येथे जात असते. विशेष म्हणजे संपूर्ण तालुक्यातील जनता  आपले आरोग्यविषयक समस्या साठी गडचिरोली येथेच दवाखान्यात जात असते. मात्र मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात लॉक डाऊन घोषित करण्यात आले. त्यातच गडचिरोली बंदी करण्यात असल्यामुळे  सावली तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.  ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरनुले यांनी सावली तालुक्यातील जनतेला गडचिरोली येथे जाने येणे करण्याकरिता विनाअट परवानगी देण्यात यावी. असे निवेदन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावर पालकमंत्री वीजयभाऊ वडेट्टीवार यांनी येत्या १ तारखेपासून सावली तालुक्यातील जनतेला  गडचिरोली येथे जाणे येणे करण्यासाठी  विनाअट परवानगी देण्यात येईल असे आश्वासन दिले.  यावेळेस सामाजिक कार्यकर्ते  अनिल गुरनुले यांचेसोबत,  पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अनिल स्वामी,  काँग्रेस कमिटी सावली चे सचिव नितीन गोहने, नगरसेवक गुणवंत सुरमवार,  पिंटू गड्डमवार, पत्रकार राकेश गोलेपल्लिवार,  ईश्वर मोहूर्ले, सचिन इंगुलवार,  व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.