तणनाशक औषध सवलतीच्या दरात उपलब्ध करावे याबाबत पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना देण्यात आले निवेदन.
Bhairav Diwase. June 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- राज्य शासनाने जाहीर केलेले शासकीय आधारभूत धान्य खरेदीवर 700 रु बोनस बरेचश्या शेतकऱ्यांना अजून मिळाले नसून खरीप हंगामाला सुरवात झालेले असून, बोनस न मिळाल्याने शेतकर्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. त्यामुळे उर्वरित 700 रु बोनस त्वरित देण्याची मागणी अनिल स्वामी यांनी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली . याबरोबरच खरीप हंगाम प्रमाणे रब्बी हंगामातील धान खरेदीला 400 रु बोनस द्यावे. सावली तालुक्यात 20,20,0,13 तसेच D A P, युरिया तसेच इतर खताचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे , त्याचप्रमाणे तणनाशक औषध सवलतीच्या दरात उपलब्ध करावे याबाबतचे निवेदन पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार याना देण्यात आले यावर मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यास त्वरित फोन करून माहिती घेतली व सदर बाब त्वरित पुर्ण करण्याचा शब्द दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल स्वामी, गटनेते गुणवंत सुरमवार, पिंटू गड्डमवार, अनिल गुरनुले, वामन भोपये उपस्थित होते .