Click Here...👇👇👇

लोकनेते श्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांच्या हस्ते किट, प्रशस्तीपत्र व भेट वस्तूचे वितरण करून सन्मानित.

Bhairav Diwase
लोकनेते आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी रक्तदात्याचे मानले आभार.
Bhairav Diwase.   June 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात दि 31:5:2020 रोज रविवार ला चिंतामणी काँलेज पोंभुर्णा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माननीय श्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 08/06/2020 रोज सोमवारला सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांच्या हस्ते जामखर्द येथील सरपंच धनराज (बंडु) बुरांडे यांना किट, प्रशस्तीपत्र व भेट वस्तूचे वितरण करून सन्मान करण्यात आला.  
           या लोकहिताच्या कार्याला रक्तदात्यांनी भरभरून सहकार्य केल्याबद्दल लोकनेते आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी रक्तदात्याचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य शाहू मडावी व इतर व्यक्ती उपस्थित होते.