तेलंगाणा सीमेवर मुद्देमालासह ऐकून 25 लाख रुपयांचा गोमांस जप्त.

Bhairav Diwase
ट्रक मधील तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात; तीन दिवसातील ही दुसरी घटना.
Bhairav Diwase.    July 25, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा पोलीस गुप्त माहितीवरून  तेलंगणा सीमेवर नाकाबंदी केली असता एका ट्रक मध्ये सुमारे 10 टन गोमांस आढळून आल्याने ट्रक मधील तिघांना ताब्यात घेऊन मुद्देमालासह 25 लाख रुपयांचा गोमांस जप्त केला आहे तीन दिवसातील हि दुसरी कारवाई असल्याने पोलिसांचे कौतुक होत असले तरी लाकडाऊन काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांस कुठून कसे आले आणि कामठी वरून  तेलंगणा सीमेपर्यत पोहचले कसे याचा सुद्धा तपास करण्याची मागणी जनतेत होत आहे
 राजुरा पोलिसांना पाळीव जनावरांची तस्करी राजुरा मार्गे होत असल्याचे गुप्त माहितीवरून तेलंगणा सीमेवरील तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून प्रत्येक  वाहनांची तपासणी करीत असता mh 40 ,3762 क्रमांकाचे ट्रक मधून दुर्गंधी येत असल्याने झडती घेतली असता त्यात गोमांस आढळून आले सदर  गोमांस कामठी वरून हैद्राबादला नेण्यात येत होता यावरून ट्रक मधील मोहम्मद आरिफ मोहम्मद हनिफ,तारी कमाल मोहम्मद रिजवाण,मिसकण मोहम्मद मसूद  या आरोपीना ताब्यात घेऊन सदर ट्रक राजुरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला तपासणी अँती ट्रक मध्ये 10 टन  गोमांस सुमारे 10 लाख रुपये किम आणि 15 रुपये किमतीचे ट्रक असा 25 लाख रुपयांचा मुद्देमालासह तीन आरोपींना अटक करण्यात आले असून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव याचे मार्गदर्शनात ठाणेदार नरेंद्र कोसुरकर,पोलीस हवालदार आनंदराव आत्राम,सचिन पडवे,ईश्वर पढरे, ज्ञानेश्वर मडावी,महामार्ग पोलीस संतोष कनकम,प्रवीण बोबडे,चालक दिनेश मेश्राम यांनी केली आहे.